Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा नगरपरिषदेत ’सेल्फी विथ व्होट स्पर्धा’

मताचा टक्का वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

देवळाली प्रवरा ः वाढत्या उष्णतेमुळे मतदारराजा मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने देवळाली प्रवरा नगर पालिकेने मतदारांमध्ये जन जागृती व्हावी आणि जास्तीत

मुंबईत 2053 लोकांना बनावट लस l पहा LokNews24
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
पाथर्डी तालुक्यातील उद्योजकाला खंडणीची मागणी

देवळाली प्रवरा ः वाढत्या उष्णतेमुळे मतदारराजा मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने देवळाली प्रवरा नगर पालिकेने मतदारांमध्ये जन जागृती व्हावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी ’सेल्फी विथ व्होट स्पर्धा’ आयोजित करून आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. स्पर्धेच्या नियम व अटी सर्व नगरपरिषदेने पालिकेच्या फलकावर लावले सोशल मिडीयाद्वारे स्पर्धेचा प्रचार व प्रसार नगर परिषद करीत आहे. शहरातील सर्व स्तरावरील नागरिकांनी मतदान करावे. हाच या स्पर्धेचा हेतू असल्याचे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले. नगरपालिकेने दिलेल्या लिंकवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व माहिती भरून आपला सहभाग निश्‍चित करावा. जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासकीय अध्यक्ष किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

COMMENTS