Homeताज्या बातम्यासंपादकीय

स्वयंघोषित नेत्यांनी मराठा-ओबीसी समाजात शत्रूत्व निर्माण करू नये!

ओबीसी समाज हा प्रामुख्याने वैचारिक आहे. व्यवहारवादाशी त्याचं फारसं जुळत नाही. तो विचारांनी पुरोगामी आहे.  विचारांनीच तो आपल्या सामाजिक आणि राजकीय

लाईन्सटाप संघटनेला सावली दिव्यांग संघटनेचा पाठिंबा : चांद शेख
भिवंडीमध्ये फर्निचरच्या शोरूम सह कारखान्यास भीषण आग | LOKNews24
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसमध्येच महिलेची प्रसूती

ओबीसी समाज हा प्रामुख्याने वैचारिक आहे. व्यवहारवादाशी त्याचं फारसं जुळत नाही. तो विचारांनी पुरोगामी आहे.  विचारांनीच तो आपल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीची वाटचाल करीत असतो. परंतु, अशा काळामध्ये ओबीसींचे नेतृत्व स्वीकारण्याचे किंवा स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणवणार्यांनी वैचारिक भूमिका मांडूनच, विधानसभेच्या राजकारणाची भूमिका मांडावी.  या ऐवजी ओबीसी समाज हा लोकसभेचा बदला घेईल किंवा सूड घेईल किंवा महाविकास आघाडी किंवा त्यातील एखाद्या घटक पक्षाला आडवा करेल, अशा प्रकारची भूमिका मांडणे, दुसऱ्या बाजूला महायुतीतील एखाद्या नेत्याला नेता बनवून त्याविषयीची सहानुभूतीपूर्वक मते मांडणे, या बाबी परस्पर विरोधी आहेत. वास्तविक, प्रा. लक्ष्मण हाके हे बुद्धिजीवी क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून सुरू असलेले त्यांचं आंदोलन, हे ओबीसी समाजाचे समग्र आंदोलन नाही.  तरीही ते आपली राजकीय भूमिका मांडताना कोण्या एका आघाडीची किंवा नेता विशेषाची भूमिका घेत किंवा बाजू घेत आपले विचार मांडतात. समस्त ओबीसी समाजाला दावणीला बांधतात. ओबीसी समाज हा काही सूड भावनेने समाजकारण किंवा राजकारण करणारा घटक नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये आरक्षणाचा संघर्ष निश्चित झाला. तणावही निर्माण झाला. परंतु, हे लोकशाही व्यवस्थेमधील परस्पर संघर्ष आहेत; हे वैर नाही किंवा शत्रुत्व नाही! परंतु, प्रा. लक्ष्मण हाके या सगळ्या बाबींना शत्रूभावी करीत, दोन समाजप्रवर्गांना एकमेकांचा शत्रू करण्याचं काम मात्र करीत आहेत. ही बाब ओबीसी समाजाला मान्य नाही. कारण, लोकशाही व्यवस्थेअंतर्गत अशा प्रकारच्या मागण्या उभ्या राहतात. त्यावर उपाय शोधणे, तो लोकशाही पद्धतीने सोडवलाही जातो. परंतु, प्रा. लक्ष्मण हाके हे एखाद्या जात समूहाचे अगदी शत्रूभावी वर्णन करून मराठा-ओबीसी संघर्ष शत्रूभावी करित आहेत. दोन समाज समुहामध्ये  शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसऱ्या बाजूला होळकर कुटुंबातील सदस्य जे कदाचित महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, ते होळकर कुटुंबापासून वेगळे आणि रॉयल नसल्याचं त्यांचं विधान, हे विरोधाभासी आणि ओबीसींच्या संदर्भामध्ये आंतरविरोध निर्माण करणारे आहे. वास्तविक, प्रा. लक्ष्मण हाके हे प्राध्यापक असताना त्यांनी वाचन आणि सवयीचा अभ्यास अधिक करावा. जेणेकरून संतुलित विचार मांडण्याची भूमिका त्यांना  बजावता येईल. गेल्या काही काळापासून ते संतुलित भूमिकेपासून पार परावृत्त झाले आहेत.  नेमकी परंपरागत संघ-भाजपचे ‘माधव’ या समीकरणाची भूमिका घेऊन ते वाटचाल करीत आहेत. ही भूमिका मायक्रो ओबीसींच्या हिताची ही नाही; हे आम्ही वारंवार लिहिलेले आहे. परंतु, समग्र ओबीसी समाजाचा उल्लेख करून प्रा. लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाला मराठा समाजाशी मराठा समाजाचे शत्रू ठरवीत आहेत. ही बाब कोणत्याही ओबीसी कार्यकर्त्याला नेत्याला किंव सर्वसामान्य माणसाला मान्य नाही. कारण, शेवटी ओबीसी आणि मराठा हे गाव गाड्यातील समंजस आणि सौहार्दपूर्ण वास्तव करणारे घटक आहेत. या घटकांमध्ये मतभेद असू शकतात; परंतु, शत्रुत्व नाही! लोकशाही प्रक्रियेमध्ये किंवा लोकशाही व्यवस्थेमध्ये मतभेद हे लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. ओबीसींचे स्वयंघोषित नेते म्हणून ओबीसींना शत्रूभावी ठरवून दोन प्रवर्गांमध्ये किंवा दोन समाजांमधील संघर्ष तणावग्रस्त करीत आहेत. या बाबीला एक मायक्रो ओबीसी समाजाचा घटक म्हणून कोणाचीही मान्यता नाही.

COMMENTS