Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याच्या मागणीसाठी कारेगाव ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न

नांदेड प्रतिनिधी - धर्माबाद तालुक्यातील कारेगांव इथल्या ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गावातील स्मशान

पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच
सांगली जिल्ह्यातील उमदी येथे आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण

नांदेड प्रतिनिधी – धर्माबाद तालुक्यातील कारेगांव इथल्या ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गावातील स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले.
गावातील स्मशानभूमीला जायला रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी सामूहिकरित्या आत्मदहनाचा इशारा दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्याची मागणी करीत होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ उडाला होता. सुदैवाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्याने अप्रिय घटना घडली नाही.

COMMENTS