Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सभागृह उभारण्यासाठी पाच कोटीचा पहिला हप्ता

सभागृहामुळे केजच्या वैभवात भर

केज प्रतिनिधी - केज शहरात स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सभागृह उभारण्यासाठी पाच कोटीचा पहिला हप्ता जमा यासभागृहामुळे केज शहराचे व

राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील
गुजरातेत विक्रम तर हिमाचलमध्ये पराभव ! 
टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने सादर केले एनएफओ

केज प्रतिनिधी – केज शहरात स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सभागृह उभारण्यासाठी पाच कोटीचा पहिला हप्ता जमा यासभागृहामुळे केज शहराचे वैभवात भर
आमदार सौ. नमिताता मुंदडा यांनी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांना केज नगरपंचायतच्या विविध विकास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाच कोटीचे पहिल्या हप्त्याचे गिफ्ट दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेले अनेक वर्षापासून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने केज शहरांमध्ये सभागृह होणार आशा अनेक दैनिकांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या व नागरिकांमधून चर्चाही होत होत्या परंतु प्रत्यक्षात आज पर्यंत सभागृह झाले नाही.
जनविकास परिवर्तन आघाडीची केज नगरपंचायत मध्ये सत्ता येताच हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जागा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सभागृहासाठी वर्ग करून नगरपंचायतला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सभागृहासाठी जागेची नोंद करून घेतली.
 माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सभागृह मंजूर करून निधी आणला होता परंतु सभागृहाला जागा त्यावेळी उपलब्ध नसल्याकारणाने सभागृह त्या वेळेला होऊ शकले नाही. सदर सभागृहाच्या जागेची नोंद करून घेतल्यानंतर केज नगरपंचायतच्या माध्यमातून हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांनी सहकार्य करून केज नगरपंचायत अंतर्गत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने केज शहरात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने भव्य असे सभागृह उभारण्यासाठी पाच कोटीचे पहिल्या हप्त्याचे पत्र दिनांक 29 मार्च 2023 रोजी विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात जनविकास परिवर्तन आघाडीचे मार्गदर्शक अंकुशराव इंगळे, हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्याकडे दिले.

COMMENTS