Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळेश्‍वर विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथे कोतुळेश्‍वर विद्यालयात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक शिक्षक संघ आणि रयत गुरुकुल पालक शिक

प्रदीर्घ चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक
स्त्रियांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज -कविताताई आव्हाड
Sangamner : नांदुर ते बावपठार, माहुली रस्त्याची दुर्दशा (Video)

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथे कोतुळेश्‍वर विद्यालयात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक शिक्षक संघ आणि रयत गुरुकुल पालक शिक्षक संघाची सहविचार सभा नुकतीच पार पडली. सन 2024 -2025 या वर्षाकरिता शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थानिक  पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी शिक्षक भास्कर कवडे, विनोद खतेले, जिजाराम गोडे, सुनील गिते यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील शिक्षक भास्कर कवडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा उपस्थित पालकांनी सत्कार केला. यावेळी पुढील प्रमाणे समित्या व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी काळे संजय धोंडिभाऊ, उपाध्यक्षपदी वाकचौरे शितल चंद्रकांत, सचिवपदी पाळंदे यु एम (मुख्याध्यापक) यांची निवड करण्यात आली. तर रयत गुरुकुल पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी पाळंदे यु एम.(मुख्याध्यापक),  उपाध्यक्षपदी गिते सुनिल रामनाथ, सचिवपदी खतेले विनोद सखाराम, माता पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी पाळंदे यु.एम( मुख्याध्यापक), उपाध्यक्षपदी वायळ अनिता शांताराम, सचिवपदी- श्रीम.सोनवणे विजया परशराम,  सहसचिवपदी साबळे गितांजली राजेंद्र, शिक्षक पालक संधाच्या अध्यक्षपदी पाळंदे यु एम (मुख्याध्यापक), उपाध्यक्षपदी देशमुख बाळासाहेब शिवनाथ, सचिवपदी लांघी सुनिल विठ्ठल, सहसचिवपदी साबळे मनिषा भागा, यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम पाळंदे यांनी प्रस्ताविक केले. सुनिल लांघी यांनी सूत्रसंचालन केले तर क्रीडा शिक्षक भागवत देशमुख यांनी उपस्थित शिक्षक पालक यांचे आभार मानले.

COMMENTS