Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यातील विद्यार्थ्यांची मर्दानी खेळांसाठी निवड

शिवशंभू मर्दानी कला व क्रीडा संस्थेचे विद्यार्थी अयोध्येत करणार मर्दानी खेळ

राहाता ः अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरातून राम भक्त आयोध्याकडे रामलालाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जात आहे.

उदय सामंतांवरील हल्ल्याने राजकीय वातावरण तापले
धनगर आरक्षण लढा तीव्र करा मी ताकदीने पाठीशी.:- मनोज जरांगे  
कर्मचारी संपावर.. तहसीलदार मात्र एकट्या कामावर; पारनेरमध्ये आ. लंके-देवरे वाद दिवसेंदिवस चिघळण्याच्या मार्गावर

राहाता ः अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरातून राम भक्त आयोध्याकडे रामलालाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जात आहे. या येणार्‍या रामभक्तांना प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक व व प्राचीन कला पाहण्यास मिळावी यासाठी यूपी सरकारने प्रत्येक राज्यातील कला सादर करण्याचे ठरवले त्यामध्ये महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन कला तलवारबाजी, दानपट्टा व लाठी काठी इतर प्राचीन कला पाहावयास मिळवण्यासाठी राहात्यातील शिवशंभू मर्दानी संस्थेच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
शिवशंभू मर्दानी कला व क्रीडा प्रशिक्षण संस्था या संस्थेच्या अंतर्गत मर्दानी खेळ दांडपट्टा ,लाठीकाठी, तलवारबाजी इत्यादी प्रशिक्षण शहरातील विद्यार्थ्यांना गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून  दिले जाते तसेच अनेक महापुरुषांच्या जयंती व उत्सव कार्यक्रमांमध्ये मर्दानी खेळाचे कलाकार आपलं प्रत्यक्ष दाखवत असतात तसेच सोशल मीडिया युट्युब ,फेसबुक, इंस्टाग्राम याच्या वर हे खेळ अपलोड केले जातात. सादरीकरण केलेले व्हिडिओ शेअर केले जातात याच पब्लिसिटी व सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत सरकार संस्कृत विभाग,उत्तर प्रदेश,लोक एवं जनजाती संस्कृती संस्था यवम जवाहर भवन अशोक मार्ग,लखनऊ यांच्या वतीने निवड करण्यात आली. राहाता येथील मर्दानी खेळाचे पथक यांची श्री राम जन्मभूमी आयोध्या या ठिकाणी लाठीकाठी, दानपट्ट्याच्या कार्यक्रम सादरीकरण करता निवड करण्यात आली यामध्ये प्रशिक्षक विजय अशोक मोगलेसह 14 विद्यार्थी येत्या 15 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. यामध्ये 18, 19 व 20, मार्च या 3 दिवसात अयोध्या यथील तुळशीबाग या ठिकाणी हा कार्यक्रम सादर होणार आहेत. या कार्यक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी सुवर्णा विजय मोगले, भावना ज्ञानेश्‍वर निमसे, प्राची निमसे, वैभवी  पुंड, सायली तलरेजा, प्रगती चोखर, आशिष प्रभुणे, सागर वाघे, साई निमसे, साहिल  फुलडहाळे, हर्षल विजय मोगले,अनंत विजय मोगले, तन्मय तुपे, ध्रुव पटेल हे 14 विद्यार्थी आयोध्या येथे जाणार असून तेथे मर्दानी खेळ सादर करणार आहेत.

COMMENTS