Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा.डॉ.संजय गवई यांची तज्ञ व्याख्याते म्हणून निवड

लातूर प्रतिनिधी - महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील सहयोगी प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा. डॉ. संजय

तापी नदीवरील पूल कोसळला
सोलापुरात आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
अहमदाबाद-तिरुचिरापल्ली साप्ताहिक विशेष रेल्वे

लातूर प्रतिनिधी – महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील सहयोगी प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा. डॉ. संजय गवई यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे समाजकार्य विद्यार्थ्यांना नेट/सेट परीक्षा पूर्व ऑन लाईन मार्गदर्शनासाठी ‘समाजकार्य विषयातील तज्ञ मार्गदर्शक व्याख्याते’ म्हणून निवड झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून या संस्थेद्वारे समाजातील अनुसूचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी संशोधन, प्रशिक्षण, जात पडताळणी तपासणी, विस्तार आणि सेवा, विविध योजना, लेखा विभाग आणि आस्थापना अशा विविध विभागामार्फत कार्य करते. या संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि संचालक सुनील वारे यांचे मार्गदर्शन मिळते. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील आणि इतरही समाजकार्य विषयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सेट/नेट परीक्षा संबंधी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन यूट्यूबच्या माध्यमातून सध्या दिले जात जात आहे. त्यांनी मागील 22 वर्षापासून अध्यापनासोबतच विविध शासकीय आणि स्वयंसेवी संस्थेतील स्वयं सहायता समूह चळवळीमध्ये आणि युवक विकासात सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS