Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची निवड

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग व क्रिकेट स्पर्धेत मिळणार संधी

पाथर्डी/प्रतिनिधी ः अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग व क्रिकेट स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात बाबुजी आव्हाड महाविद्यालया

रस्त्याची पोलखोल केल्याने सरपंच पतीकडून शिवीगाळ
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी
धान्य विकणार्‍या रेशन दुकानदार मोकाटच ; कारवाईसाठी उपोषणचा इशारा

पाथर्डी/प्रतिनिधी ः अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग व क्रिकेट स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये चंदिगड विद्यापीठ, मोहाली येथे होणार्‍या मुलांच्या आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी 55 किलो वजन गटात दिपक वाघ, 61 किलो वजन गटात संजय लोखंडे व 109 किलो वजन गटात गौरव डोईजड यांची निवड झाली आहे.सदर निवड वरील तिन्ही खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागिय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्या मुळे करण्यात आली आहे. तसेच आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेतील चमकदार कामगिरी मुळे कु. ज्ञानेश्‍वरी वाघ आणि कु. अंबिका वाटाडे या दोघींची के.आय.आय.टी. विद्यापीठ भुवनेश्‍वर येथे होणार्‍या मुलींच्या आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी या खेळाडूंचे  अभिनंदन केले. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS