Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स स्पर्धेसाठी निवड

पाथर्डी प्रतिनिधी - बालेवाडी पुणे येथे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन द्वारा आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स स्प

श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन
अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण
कर्मवीरांसोबत आदर्श शिक्षकांमुळे जीवन परिपूर्ण झाले ः  प्रा. विलासराव तुळे

पाथर्डी प्रतिनिधी – बालेवाडी पुणे येथे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन द्वारा आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स स्पर्धेसाठी बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी येथील पाच खेळाडूंची निवड झाली आहे.  दिनांक ९ ते १२ जानेवारी रोजी होणाऱ्या वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी कु. योगिता खेडकर, संजय लोखंडे व किरण खेडकर यांची तर पै.अनिल लोणारे, कुस्ती व साईनाथ ढाकणे यांची आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  या निवडीबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड,उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे यांनी खेळाडूंचे  अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे  मार्गदर्शन लाभले.

COMMENTS