Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ध्रुव ग्लोबलच्या जलतरणपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

संगमनेर ः अहमदनगर जिल्हा जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर

राहाता नगरपरिषदेस 14 कोटी निधी मंजूर
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
रस्ता खोदल्यामुळे नागरिकांचे होणारे हाल थांबवावे ः सोमवंशी

संगमनेर ः अहमदनगर जिल्हा जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर्शन करताना पदकांची लयलुट केली. वेगवेगळ्या अंतर व प्रकाराच्या या स्पर्धेत ध्रुवने प्रत्येकी सात सुवर्ण व नऊ कांस्यपदकांसह एकूण 23 पदकांची कमाई करताना विभागीय स्पर्धेची कवाडेही उघडली. लोणीच्या सैनिकी स्कूलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ‘ध्रुव’चा बोलबाला बघायला मिळाला. ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS