Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड

पाथर्डी प्रतिनिधी - चंदिगड विद्यापीठ,मोहाली येथे दिनांक २५ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये होणाऱ्या मुलांच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेट

बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या तब्बल 109 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम

पाथर्डी प्रतिनिधी – चंदिगड विद्यापीठ,मोहाली येथे दिनांक २५ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये होणाऱ्या मुलांच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे. 

            ६७ किलो वजन गटात संजय लोखंडे, १०२ किलो वजन गटात प्रतीक शिळवणे व १०९ किलो वजन गटात गौरव डोईजड यांची निवड झाली आहे. सदर स्पर्धेसाठी राजमुंद्री, आंध्र प्रदेश येथे झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेतील प्रत्येक वजन गटात टॉप १६ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

        या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, उपप्राचार्य डॉ. बी. ए. चौरे  तसेच अहमदनगर डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी या खेळाडूंचे  अभिनंदन केले. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS