महामार्गावर वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामार्गावर वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी

उस्मानाबाद-लातूर रोडवरील घटना

उस्मानाबाद प्रतिनिधी -  उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी काही महाराष्ट्

बीडमध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या
रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामने लग्नानंतर दिली रिसेप्शन पार्टी
’गो फर्स्ट’ ची एनसीएलटीकडे याचिका

उस्मानाबाद प्रतिनिधी –  उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी काही महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र उस्मानाबाद-लातूर रोडवर एक वाहतूक पोलीस वाहन चालकाला हप्ता मागतान कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बार्शी तालुक्यातील अस्लम जानूर शेख आपल्या वाहनात शेळ्या घेऊन लातूरकडे चालला होता. उस्मानाबाद – लातूर हद्दीवर पोलिसांनी त्याची गाडी आडवली. त्याच्याकडे पैशांची मागणी केली. खटला दाखल केला तर चार हजार दंड होईल. प्रत्येक शेळीचे 10 रुपये पैसे दे, अशी मागणी केली. हे महाशय एवढ्यावरच थांबले नाहीत तर या पुढे रिकाम्या गाडीचे 50 तर भरलेल्या गाडीचे 100 रुपये लागतील, असं वाहन चालकाला सुनावले. या प्रकरणी संबंधित पोलिसावर कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

COMMENTS