नवी दिल्ली : येत्या काळात दक्षिण भारताला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असून तेलंगणातील सिकंदराबाद ते आंध्रप्रदेशातील तिरुपती या दोन प्रम

नवी दिल्ली : येत्या काळात दक्षिण भारताला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असून तेलंगणातील सिकंदराबाद ते आंध्रप्रदेशातील तिरुपती या दोन प्रमुख शहरांना ही ट्रेन जोडणार आहे. आगामी 8 एप्रिल 2023 रोजी या गाडीचा शुभारंभ होणार असून देशाच्या दक्षिण भागातील ही आठवी गाडी ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. देशातील प्रत्येक भाग सेमी-हाय स्पीड ट्रेनने जोडण्यासाठी देशभरातील वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्याचा प्रयत्न रेल्वे सातत्याने करत आहे.
COMMENTS