Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिव भांगेंच्या अतिरेकी शिफारशीमुळे बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योतीच्या स्वायत्तेवर येणार गदा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्वायत्त असणार्‍या संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी

श्रीमती जयश्री सोनकवडेंसह तीन अधिकार्‍यांवर दखलपात्र गुन्हा दाखल
रत्नागिरी सा.बां.ची ‘निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर’वर ‘अर्थ’पूर्ण कृपादृष्टी !
सचिव सुमंत भांगेचा एक हजार कोटींचा भोजनठेका घोटाळा ?

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्वायत्त असणार्‍या संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर,(महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था पुणे(सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (टीआरटीआय), या सर्व संस्थांना समाजाच्या कल्याणासाठी शासन नियमाचे अडथळे येऊ नयेत व संशोधन व प्रशिक्षणाच्या योजनांची जलदगतीने व प्रभावीपणे अमलबजावणी होण्यासाठी नियामक मंडळे स्थापन करुन स्वायत्तता देण्यात आली आहे. मात्र ही स्वायतत्ता मोडीत काढण्याचा प्रयत्न सचिव सुमंत भांगे यांनी चालवला आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या सर्व स्वायत्त संस्थांना समाजाच्या कल्याणासाठी शासन नियमाचे अडथळे येऊ नयेत व संशोधन व प्रशिक्षणाच्या योजनांची जलदगतीने व प्रभावीपणे अमलबजावणी होण्यासाठी नियामक मंडळे स्थापन करुन स्वायत्तता देण्यात आली आहे. सदरील नियामक मंडळात ज्येष्ठ मंत्री तसेच वरीष्ठ सनदी अधिकारी आहेत व त्यांनी योजना आखून अंमलबजावणीचे अधिकार दिलेले आहेत. सर्व स्वायत्त संस्थांचे प्रशिक्षण कार्यक्रम सारखेच असावेत म्हणून नुकतीच 10 मे 2023 रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत बार्टीचे पदसिध्द अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी एक ठराव मांडून या सर्व संस्थांची स्वायत्तता धोक्यात आणली. तो ठराव असा की, या संस्थांचे नियामक मंडळाने कुठलाही समाजपयोगी ठराव घेतला की त्याची अंमलबजावणी त्यांनी न करता त्यांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीची मंजूरी घ्यावी लागेल. याचा अर्थ या सर्व संस्थांच्या स्वायत्ततेला काहीही अर्थ राहणार नाही व प्रत्येक बाबीच्या मंजूरीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीवर अवलंबून राहावे लागेल. म्हणजे या संस्था कुचकामी ठरतील. सचिव सुमंत भांगे यांनी बार्टीच्या सर्व प्रशिक्षण योजना बंद पाडून अनुसूचित जातीच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहेच. ते आता मराठा, ओ.बी.सी., व्ही.जे.एन.टी. आदीवासी विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यास निघाले आहेत. सदरील प्रस्ताव भांगे लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवणार आहेत. लोकप्रिय बहुजन कल्याण मंत्री मा.ना. अतुलजी सावे, मा.विजयकुमार गावीत व छत्रपती संभाजी महाराजांनी सचिव सुमंत भांगेचा हा कुटील डाव हाणून पाडावा व सर्व संशोधन व प्रशिक्षण संस्थांची स्वायत्तता आबाधित ठेवावी व राज्यातील सर्व समाजाच्या तरुणांना आवाहन करतो. आपले शैक्षणिक नुकसान करणारा ठराव मंजूर होऊ नये म्हणून सर्वोतपरी प्रयत्न करावेत असे आवाहन सुचित सोनवणे बहुजन विद्यार्थी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीराजेंनांच शह देण्याचा प्रकार ? – मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेत सारथी या संस्थेंच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देत, या विद्यार्थ्यांचे पालकत्वच एकप्रकारे छत्रपती संभाजीराजेंनी घेतले होते. मात्र सारथीची स्वायत्ता धोक्कयात आणून एकप्रकारे या संस्थेचे पालक असलेल्या छत्रपती संभाजीराजेंना शह देण्याचाच तर हा प्रकार नव्हे ना त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी याप्रकरणी लक्ष देवून या संस्थांची स्वायतत्ता अबाधित राखण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा असा कुटिल डाव हाणून पाडण्याची गरज आहे.

हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य येईल धोक्यात – बार्टी, महाज्योती, सारथी आणि टीआरटीआय या संस्थांची स्वायत्ता धोक्यात आल्यास निर्णय प्रक्रियेस विलंब होवून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येवू शकते. संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. मात्र या संस्थांची स्वायत्ता संपुष्टात आणण्याचा डाव मांडला जात आहे.

COMMENTS