Homeताज्या बातम्याक्रीडा

राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय

राजस्थान रॉयल्सने आयपीएल्या 17 व्या मोसमातील नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 12 धावांनी मात केली आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विज

IPL 2023 ने बनवले करोडपती
भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले
पर्यटन विकास योजनेतून टेबल लॅन्ड पठारावरील वाहनतळासाठी 1 कोटी 13 लाखाचा निधी : आ. पाटील

राजस्थान रॉयल्सने आयपीएल्या 17 व्या मोसमातील नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 12 धावांनी मात केली आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 173 धावाच करता आल्या. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि अखेरीस ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी 40 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. मात्र या दोघांव्यतिरिक्त इतरांना काही विशेष करता आलं नाही. राजस्थानने अशाप्रकारे या हंगामातील आपला सलग दुसरा सामना जिंकला. तर दिल्लीचा हा दुसरा पराभव ठरला. दिल्लीला विजयसाठी 20 व्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती. तर मैदानात ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल ही सेट जोडी खेळत होती. दिल्लीकडून आवेश खान याने हुशारीने 20 ओव्हर टाकली. आवेशने आपल्या या ओव्हरमध्ये एकही बॉल मारायला दिला नाही. आवेशची हीच अखेरची ओव्हर निर्णायक ठरली. दिल्लीला विजयाची संधी होती. मात्र आवेशने मॅच फिरवली. आवेशने फक्त 4 धावाच दिल्या आणि राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

COMMENTS