Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल अंबानीसह 24 उद्योजकांवर सेबीची कारवाई

5 वर्षांची बंदी घालत ठोठावला 25 कोटींचा दंड

मुंबई ः भारतीय बाजार नियामक संस्था अर्थात सेबीने उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालत तब्बल 25 कोटींचा दंड शुक्रवारी ठोठावला. अ

किल्ले धारूर येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात कायदेविषयक जन जागृती शिबीर संपन्न
कसबे सुकेणे शिवारात बिबट्या जेरबंद
राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई ः भारतीय बाजार नियामक संस्था अर्थात सेबीने उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालत तब्बल 25 कोटींचा दंड शुक्रवारी ठोठावला. अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी अधिकार्‍यांसह 24 इतर संस्थांसह उद्योजकांवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. फंड डायव्हर्जनच्या आरोपांखाली सेबीने ही मोठी कारवाई केली आहे.
सेबीने अनिल अंबानी आणि इतर 24 जणांवर कडक कारवाई केली. सेबीने अनिल अंबानींना मार्केटमध्ये नोंदणीकृत कोणत्याही लिस्टेड कंपनी किंवा कंपनीचे संचालक किंवा अन्य व्यवस्थापक यासारख्या महत्त्वाच्या पदांवर राहण्यास देखील मनाई केली आहे. सेबीने रिलायन्स होम फायनान्स विरोधातही कठोर कारवाई केली आहे. सेबीने रिलायन्स होम फायनान्सला सिक्युरिटीजवर मार्केटमधून 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. तसेच कंपनीला 6 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सेबीने त्यांच्या 222 पानांच्या अंतिम आदेशात महटले आहे की, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड अर्थात सेबीला आढळले की अनिल अंबानी यांनी रिलायन्स होम फायनान्सच्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचार्‍यांच्या मदतीने, रिलायन्स होम फायनान्सकडून संबंधितांना कर्ज देऊन निधी काढून टाकण्यासाठी एक खोटा कट रचला.
रिलायन्स होम फायनान्समधील निधी त्यांच्याशी संबंधित संस्थांना कर्ज म्हणून दाखवून फसव्या योजना देखील आखल्या होत्या. कंपनीशी संबंधित कंपन्यांना कर्ज दिल्याचे खोट दाखवत त्यांनी लपवले होते. आरएचएफएलच्या संचालक मंडळाने अशा कर्ज पद्धती थांबवण्याचे आदेश जारी केले होते. कॉर्पोरेट कर्जाचे नियमितपणे पुनरावलोकन केले तरीही कंपनीच्या व्यवस्थापनाने या आदेशांकडे दुर्लक्ष केले. सेबीच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये अनेक चुका होत्या ज्या, अनिल अंबानींच्या प्रभावाखालील काही प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचार्‍यांनी केल्या होत्या. ही परिस्थिती पाहता, रिलायन्स होम फायनान्स कंपनी या फसवणुकीत गुंतलेल्यांइतकीच जबाबदार धरू नये. याव्यतिरिक्त, उर्वरित संस्थांनी एकतर बेकायदेशीरपणे मिळवलेल्या कर्जाचे प्राप्तकर्ता असण्यात किंवा रिलायन्स होम फायनान्सकडून बेकायदेशीरपणे निधी वळवण्याची प्रक्रिया पार पाडण्यात भूमिका बजावली आहे, असे नियामकाने म्हटले आहे. सेबीने म्हटले आहे की, त्यांच्या निष्कर्षांनुसार, फसवणूक करण्याचा कट अनिल अंबानी द्वारे रचला गेला व आरएचएफएलच्या केएमपीने अंमलात आणला. या षड्यंत्राद्वारे, सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी आणि त्या कडून निधी वळवण्यात आला. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित संस्थांचे प्रवर्तक असल्याचे देखील आढळले आहे.

अंबानींशिवाय इतर उद्योजकांना देखील ठोठावला दंड – सेबीने अंबानी यांना 25 कोटी रुपये, बापना यांना 27 कोटी रुपये, सुधाळकर यांना 26 कोटी रुपये आणि शहा यांना 21 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, रिलायन्स युनिकॉर्न एंटरप्रायझेस, रिलायन्स एक्सचेंज नेक्स्ट एलटी, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, रिलायन्स क्लीनजेन लिमिटेड, रिलायन्स बिझनेस ब्रॉडकास्ट न्यूज होल्डिंग्स लिमिटेड आणि रिलायन्स बिग एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या उर्वरित संस्थांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

COMMENTS