Homeताज्या बातम्यादेश

कुरघोडी करण्याऱ्या चीनला खडसावले

अरुणाचलच्या ३० ठिकाणांची नावे बदलल्यावर भारताने दिला दम

नवी दिल्ली प्रतिनिधी - कधी कुरघोडी, तर नेहमीच भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये नाक खुपसण्याची खोड असलेल्या चीनचे भारतानं चांगलेच कान पिरघळले.

राज ठाकरेंच्या मनसेला ‘अच्छे दिन’… युवा शिवसैनिकांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
Ukraine War: ‘आम्ही करून दाखवलं!’ , व्हिडीओ व्हायरल | LOKNews24
अभिनेते प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली प्रतिनिधी – कधी कुरघोडी, तर नेहमीच भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये नाक खुपसण्याची खोड असलेल्या चीनचे भारतानं चांगलेच कान पिरघळले. अरुणाचल प्रदेशातील ३० ठिकाणांची नावं बदलणाऱ्या चीनची भारतानं चांगलीच जिरवली. चीनने वेळीच सुधारावे. लबाडी सहन करणार नाही, असा सज्जड दमच भारतानं भरला. चीनने काही दिवसांपूर्वी भारतातील अरुणाचल प्रदेशमधील काही भागांवर दावा केला. त्यानंतर या भागांची नावे बदलत एकूण नावे जाहीर केली आहेत. मात्र, चीनचा दावा तर्कहीन असल्याचे सांगत भारताने अरुणाचल प्रदेशवरील दावा फेटाळला. चीनने ३० जागांची नावे बदलल्याचा दावा केल्यानंतर भारतीय प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी चीनला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चीनचे अविचारी प्रयत्न सुरु आहेत. आम्ही त्यांचा दावा फेटाळतो. त्यांनी काही भागांचे नावे बदलल्याचा दावा केला असला तरी वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. तसेच भविष्यातही राहील, असे रणधीर जैस्वाल यांनी सांगितलं.

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटलं की, चीनने चुकीचे दावे करु नयेत. एकच बाब पुन्हा पुन्हा सांगून, काही भागांची नावे बदलू शकत नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये भारताचा कायदा, नियम आणि योजना लागू आहेत. तसेच यापुढे लागू राहतील’.चीनच्या अरुणाचल प्रदेश दावा केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘या प्रकारे भागांची नावे बदलल्याने ते तुमचं होणार नाही. मला एखादं घर आवडलं. त्यानंतर माझ्या मर्जीनुसार, मी त्या घराला एखादं नाव दिलं, तर ते घर माझं होऊ शकत नाही. चीनने अशा मुर्खासारख्या गोष्टी सोडून द्याव्यात

COMMENTS