Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे / प्रतिनिधी : राज्यात 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार आहेत. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची

पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे
जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती
जावळी तालुक्यात चोरट्यांकडून 21 बंद घरे लक्ष्य : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे / प्रतिनिधी : राज्यात 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार आहेत. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे आणि एकही शिक्षक शाळेत नाहीत अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना आहेत, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले.
शिक्षण आयुक्तालयाने 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. मात्र, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले.
केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे आणि एकही शिक्षक शाळेत उपलब्ध नाही. अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा 18 आणि 19 रोजी नियमितपणे सुरू राहतील, असे मांढरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS