जामखेड : विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ स्वसंरक्षणासाठी व समाज हितासाठी करावा. या कलेचा सराव आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात नैपुण्य
जामखेड : विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ स्वसंरक्षणासाठी व समाज हितासाठी करावा. या कलेचा सराव आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात नैपुण्य मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांनी दवडू नये. विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक होण्याचे ज्ञान स्वसंरक्षण कलेतून घ्यावे, असे आवाहन भाजप शहर प्रमुख संजय काशिद यांनी केले.
जामखेड शहरात शिवकालीन युद्धकला तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केले होते. या शिबिरात मुला मुलींना लाठी-काठी, दांडपट्टा यासारख्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिले आहे.. मुलांच्या व मुलीच्या स्वसंरक्षणासाठी शिबिरात मुलींना मुला-लाठी-काठी, दांडपट्टा यासारख्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. शिवकालीन युद्ध कलेच्या मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणात लाठी, काठी प्रशिक्षण, दांडपट्टा प्रशिक्षण, ढाल तलवार तसेच मुलींसाठी प्राथमिक संरक्षण कौशल्य, भालाफेक या शस्त्र व शास्त्रविद्या यांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र व गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनीही युद्धकलेविषयी माहिती दिली. यावेळी उद्योजक संतोष फिरोदिया, भाजप शहर मंडळ अध्यक्ष संजय काशिद, ॲड . प्रसाद गोले, विश्व हिंदू परिषदेचे जामखेड प्रखंड मंत्री दिगंबर राळेभात, भाजप युवा नेते हृषिकेश मोरे, साहिल भंडारी, ॲड . अमोल जगताप, शिक्षक बोराटे, कपिल राऊत, आदी उपस्थित होते.
COMMENTS