Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शालेय वह्यांचे वाटप स्तुत्य उपक्रम ः पुष्पाताई काळे

कोपरगाव ः समाजात शिक्षण घेणार्‍या सर्वच मुलांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत म्हस्के क

मराठा समाजाने शिर्डीच्या कार्यक्रमाच्या बसेस पाठवल्या रिकाम्या
गटनोंदणी फुटली …मुंबईचा हस्तक्षेप झाला सुरू
अल्पवयीन मुलीस पळवून नेणारे गजाआड

कोपरगाव ः समाजात शिक्षण घेणार्‍या सर्वच मुलांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत म्हस्के कुटुंबीय मागील सहा वर्षापासून दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत आहे. यामध्ये कधी दफ्तर, कधी बूट सॉक्स व यावर्षी वह्या वाटप केल्या आहेत. त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के व सौ. लतिका म्हस्के यांच्या वतीने कोपरगाव शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक 3 या शाळेतील सर्वच विद्यार्थिनींना सौ. पुष्पाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे  वाटप करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थींनिंनी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी चांगला सकस आहार घ्यावा. चांगला अभ्यास करून शाळेचे आणि आपल्या पालकांचे नाव उज्वल करावे असा मौलिक सल्ला दिला.यावेळी विद्यार्थिनींना 720 वह्यांचे व स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक असणार्‍या पुस्तकांचे संच वाटप करत आ.आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा गंगुले, लतिका म्हस्के, रुपाली भोकरे, गायके ताई नगरपालिका शाळा क्रमांक 3 च्या मुख्याध्यापिका रजनीताई खैरनार आदी सह सर्व शिक्षक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

COMMENTS