Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारवाडीतील प्रतीक्षा कुलाळचे स्कॉलरशिप परीक्षेत यश  

अकोले ः अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले गेलेल्या अतिशय सामान्य शेतकरी कुटूंबातील मुलगी तसेच खिरविरे केंद्रातील धारवाडी शाळेतील विद्य

संभाव्य वादळीवारा व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी : तहसीलदार चंद्रे
मोदी सरकारविरोधात उद्या काळा दिवस पाळणार
शिर्डीत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास सुरूवात

अकोले ः अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले गेलेल्या अतिशय सामान्य शेतकरी कुटूंबातील मुलगी तसेच खिरविरे केंद्रातील धारवाडी शाळेतील विद्यार्थिनी प्रतिक्षा दशरथ कुलाळ (इयत्ता पाचवी) ही स्कॉलरशिप परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून पात्र झाली आहे.
प्रतीक्षा ही 298 पैकी 206 गुण मिळवून पात्र झाली आहे.तसा विचार केला तर पुस्तकी ज्ञानाशिवाय इतर कुठलेच तंत्रज्ञान नाही.नेटवर्कचा सतत आभाव असणारे तसेच इतर कोणतीच सुविधा नसणारे धारवाडी ही छोटीशी वाडी आहे. शाळेत शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यावरच प्रतिक्षाने या परीक्षेत चांगलेच यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारवाडी या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच वर्गशिक्षिका श्रीम.बच्छाव मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रतिक्षा तसेच मार्गदर्शक शिक्षिका यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या यशाबद्दल खिरविरे बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी झावरे, खिरविरे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय भांगरे यांनी वेळोवेळी गुणवत्तापूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही पालकवर्गातून चांगलेच अभिनंदन होत आहे. धारवाडी येथील ग्रामस्थांनी प्रतिक्षा तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापिका श्रीमती बच्छाव यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजू शेंगाळ, शालेय समितीचे अध्यक्ष दशरथ कुलाळ, शालेय समितीचे सदस्य सुरेश डगळे यांसह चंदर डगळे,सुरेश लाडके, विठ्ठल लाडके, भाऊराव डगळे, रामदास धोंगडे, शंकर भांगरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS