भयावह ! थेट आकाशातून चालू पाळणा कोसळला

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

भयावह ! थेट आकाशातून चालू पाळणा कोसळला

फेज-9 येथील खासगी रुग्णालयात पाच जणांना दाखल करण्यात आलं या घटनेत १० जण गंभीर जखमी झालेत

 पंजाब प्रतिनिधी /  पंजाबमधील मोहाली येथे एका जत्रेत स्विंग जॉयराइड तुटल्याने लहान मुले आणि महिलांसह 10 जण  जखमी झाले आहेत. जखमींच्या डोक्याला आणि म

शिवसेना २ खासदार लढवणार ; ते जिंकुन आणु ही आमची भूमिका l LOKNews24
आयुर्वेदातील संशोधनाद्वारे मानवजातीचे कल्याण साधता येईल : राज्यपाल
मध्य रेल्वेवर तीन हजार नव्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर

 पंजाब प्रतिनिधी /  पंजाबमधील मोहाली येथे एका जत्रेत स्विंग जॉयराइड तुटल्याने लहान मुले आणि महिलांसह 10 जण  जखमी झाले आहेत. जखमींच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फेज-9 येथील खासगी रुग्णालयातही पाच जणांना दाखल करण्यात आलं आहे. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 50 फूट उंचीवर बसवलेला हा जॉयराईड आधी थोडासा झुकला आणि नंतर 3 सेकंदात खाली पडला. यावेळी जॉयराईडमध्ये बसलेल्या लोकांना अतिशय जोराचा झटका बसला, यामुळे अनेकजण जखमी झाले. अपघात होताच मैदानात एकच गोंधळ उडाला. यादरम्यान संतप्त जमावाने मेळाव्याचे व्यवस्थापन कर्मचारी आणि बाऊन्सरचा पाठलागही केला. त्यांनी घटनास्थळावरून पळ काढत स्वतःला वाचवलं. ही संपूर्ण घटना प्रत्यक्षदर्शींनी कॅमेऱ्यात कैद केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

COMMENTS