Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रालयातच बनावट कागदपत्रांचा घोटाळा

उच्चपदस्थ अधिकारी दोषी, गुन्हे दाखल

मुंबई ः काही दिवसांपूर्वीच कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे निदर्शनास आले

प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगचा घटस्फोट
Maharashtra : राज्याचे जीएसटीचे 35 हजार कोटी कसे थांबवता ? (Video)
मियावाकी वनांसाठी चार लाख झाडांची लागवड

मुंबई ः काही दिवसांपूर्वीच कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर याप्रकरणी मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता मंत्रालयातच बनावट कागदपत्रांचा घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकारी दोषी असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
सदरील प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय गोपनीय चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये तात्कालीन उपसचिव किशोर भालेराव हे स्वतः दोषी आढळून आले आहेत. त्यांच्याबरोबरच विशेष सरकारी वकील शेखर जगताप, श्यामसुंदर आणि शरद अग्रवाल हे देखील दोषी आढळले आहेत. त्यांचादेखील आरोपींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अनेक संबंधित गुन्ह्यात विशेष सरकारी वकील म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे वकिलांची नियुक्ती केल्याची माहिती यामध्ये समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही प्रकारची सक्षम आणि कायदेशीर मान्यता न घेता भालेराव यांनी बनावट आदेश पत्र जारी केल्याचे या चौकशी अहवालामध्ये समोर आले आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाने किशोर भालेराव यांना निलंबित केले आहे. इतकेच नाही तर गँगस्टर छोटा शकील याच्याशी संबंधित खटल्यात देखील ही बनावट कागदपत्र वापरण्यात आल्याचे अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे ही कागदपत्र बार कौन्सिल कडे देखील सादर करण्यात आली आहे. या संदर्भात संजय पुनामिया यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रार नंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS