शेवगाव तालुका ः लंके आपल्यातलाच आहे हीच भावना आपली राहावी हेच नाते जपू या, माझ्यावर तुमचा अधिकार आहे. कामासाठी विनंती करायची नाही तर अधिकार वाणीन
शेवगाव तालुका ः लंके आपल्यातलाच आहे हीच भावना आपली राहावी हेच नाते जपू या, माझ्यावर तुमचा अधिकार आहे. कामासाठी विनंती करायची नाही तर अधिकार वाणीने कामे सांगा. कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका. सगळा समाज गुण्या गोविंदाने नांदायला हवा आठरा पगड समाजाला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन करणार्या छत्रपती शिवरायांचे आपण मावळे आहोत. सर्वांना बरोबर घेऊन सर्व मिळून परिसराचा विकास साधू असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केले.
नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके शुक्रवारी आभार दौर्या निमित्त शेवगावी आले असता. येथील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. प्रथम त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सभास्थळी आले. डिजेच्या निनादात व फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. माझ्या इतका भाग्यवान कोणी नाही. निवडणूक झाल्यापासून लोकांनी मला डोक्यावर घेतलंय कोणी खाली ठेवायला तयार नाही. तुम्ही मला सेवेची संधी उपलब्ध करून दिली. आता पुढील काळात मी तुमचा सेवक म्हणून काम करणार सत्ताही मिरवण्यासाठी नसते तर ती सर्वसामान्यांच्या कामासाठी असते. माझ्यासारख्या सामान्य माणसाला संसदेत पाठवले आता यापुढे सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची माझी जबाबदारी आहे. सर्व घटक पक्षाने मनापासून काम केले. सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्य क्रमाने मार्गी लावली जातील अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुनील उर्फ बंडू रासने यांनी जीवाला जीव देणारा माणूस खासदार झाला अशा शब्दात उपस्थित जन समुदायाच्या वतीने खासदार निलेश लंके यांचे स्वागत करून परिसराचा पाण्याचा व विजेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास गोल्हार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अँड. प्रतापकाका ढाकणे,वजीर पठाण, बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड, अविनाश देशमुख यांचीही भाषणे झाली.राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, शेवगाव तालुका अध्यक्ष हरीष भारदे,राष्ट्रवादी युवकचे नंदू मुंढे,शरद सोनवणे,माऊली निमसे,बाळासाहेब काळे,मच्छिंद्र आर्ले,राहुल मगरे ,एजाज काझी,आप्पा मगर, एकनाथ कुसळकर, सुनील काकडे यांच्यासह हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. दिपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. तर केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी आभार मानले.कार्यक्रम रात्री उशिरा संपल्यानंतर खासदार लंके यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पावन गणपतीचे पूजन केले व बाजार समिती समोर अमर पुरनाळे यांनी डीजे लावून क्रेनच्या साह्याने मोठा हार घालून फुलांची उधळण करत मिरी रस्त्यावरील बंटी म्हस्के यांनी डीजे फुलाचे उधळण करत फटाके तोफाची आताषबाजी करत स्वागत केले. तेथील इदगाह मैदानातील वरील दर्ग्यावर खासदार लंके यांनी चादर चढवली. त्यानंतर पैठण रस्त्यावरील आंबेडकर भवन व पुढे तळणी ग्रामस्थांचा सत्कार स्वीकारून घोटण येथील कालिका माता देवस्थानात देवीचे दर्शन घेऊन मल्लिकार्जुन महादेवाला अभिषेक व पूजा केली तेथील ग्रामस्थांचा सत्कार स्वीकारून रात्री दोनच्या सुमारास राहुरी कडे मार्गस्थ झाले.
COMMENTS