Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावरकरांचा राजकारणांसाठी होणारा वापर दुर्देवी ः रणजीत सावरकर

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यावीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे देशाचे वातावरण ढवळून निघाले असतानाच स्वातंत्र्यवीरां

शासकीय अधिकार्‍यांनी सामाजिक भावनेने काम करावे
पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन
दादरमध्ये अनाधिकृत फुले विकणारे रडारवर

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यावीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे देशाचे वातावरण ढवळून निघाले असतानाच स्वातंत्र्यवीरांचे नातू रणजित सावरकर यांनी उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे. यासंदर्भात रणजित सावरकर म्हणाले की, राष्ट्रभक्ताच्या नावाचा असा वापर होणे गंभीर आहे. काही हिंदुत्वावादी पक्ष त्यांच्या अंतर्गत राजकारणासाठी सावरकरांचा वापर करतात. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना सावरकरांचा खूप आदर होता, मणिशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलन देखील केले होते.
सावरकर स्मारकात जयंतराव टिळक हे काँग्रेसचे नेते तत्कालिन विधानपरिषदेचे सभापती हे स्मारकाचे अध्यक्ष होते. सावरकरांचा आदर बाळगणारे लोकं काँग्रेसमध्ये आहेत पण ते आवाज उठवत नसतील तर त्याला अर्थ नाही असे सावरकर म्हणालेत.उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना रणजीत सावरकरांनी ठाकरेंवर टीका देखील केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असली तरी ते स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकात अत्यंत अक्षेपार्ह, अश्‍लिल भाषेत सावरकरांवर टीका करणारे लेख लिहीले गेले. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मला भेट तर दिली नाहीच, माझ्या पत्राला देखील उत्तर दिले नाही असे रणजीत सावरकर म्हणाले. मुख्यमंत्री असताना ते बदनामीची कारवाई करु शकले असते. त्यांनी शरद पवारांवर टीका करणार्‍या केतकी चितळे या अभिनेत्रीला एक महिना जेलमध्ये पाठवले होते. शरद पवार यांच्यासाठी जो न्याय लागू झाला तो सावरकरांबद्दल झाला नाही. शरद पवार यांच्याबद्दल फार अक्षेपार्ह बोलले गेले नव्हते पण सावरकरांवर अश्‍लिल भाषेत टीका होऊन देखील ती त्यांनी मान्य केली कारण काँग्रेस त्यांचा पार्टनर होता असा टोला रणजित सावरकरा यांनी लगावला.तुमच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असेल ते व्यक्तिगत मान्य, पण जोपर्यंत ते कृतीत उतरत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही, आज जे कोणी सावरकरांचा अपमान होताना लढायला पुढे येतात ते खरे सावरकरवादी आहेत असे माझे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS