अमरावती प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना संसदेबाहेर ठेवण्याच्या भाजप सरकारच्या भूमिकेला कडाडून विरोध

अमरावती प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना संसदेबाहेर ठेवण्याच्या भाजप सरकारच्या भूमिकेला कडाडून विरोध करीत देशभर काँग्रेसजणांचा संताप उसळला आहे. अमरावती मध्ये ही आज जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने इर्विन चौक येथे काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन सकाळी 11 ते 5 दरम्यान करण्यात येत आहे.यावेळी यशोमती ठाकूर यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या.केंद्र सरकार दादागिरी करत आहे हा संविधान तोडण्याचा प्रयत्न आहे, आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे आता जीव गेला तरी चालेल पण अन्याय सहन करणार नाही अशी आक्रमक प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली.
COMMENTS