Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थर्माकोल मॅन उद्योजक रामदास माने यांना सातारा भुषण पुरस्कार

म्हसवड / वार्ताहर : थर्माकोल मॅन म्हणून जगभर ओळख असणारे आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने यांना दसरा मेळाव्यात ’आम्ही सातारकर’ विकास प्रतिष्ठान क

औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार |LokNews24
प्रतीक पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी …?
गुरुजींच्या डमीला हद्दपार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये गुरूजींचे फोटो

म्हसवड / वार्ताहर : थर्माकोल मॅन म्हणून जगभर ओळख असणारे आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने यांना दसरा मेळाव्यात ’आम्ही सातारकर’ विकास प्रतिष्ठान कडून सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी नोकरी व व्यवसायानिमित्ताने मुंबई व परिसरात स्थायिक झालेल्यांनी एकत्र येऊन मुंबई येथे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मुंबई येथे सातारकर रहिवाशांचा दसरा मेळावा घेतला जातो. या मेळाव्यात सातारा जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सातारकरांना सातारा भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. यावर्षीचा सातारा भूषण पुरस्कार रामदास माने यांना प्रदान करण्यात आला आहे.
नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज होते.
व्यावसायिक विभागात उल्लेखनीय कामगिरी बद्दल या वर्षीच्या सातारा भूषण पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपूत्र व आंतर राष्ट्रीय उद्योजक रामदास माने यांची निवड केली होती.
रामदास माने हे दुष्काळी माण तालुक्यातील लोधवडे गावचे सुपुत्र सातारा येथून आयटीआय ते पुण्यातून इंजिनिअरिंग पदवी, मिळविले. पुढे सहाशे रुपयांची नोकरी, महिना सत्तर हजार पगाराची डिमांड, अचानक बेकारी, पोटासाठी मिळेल ते काम आणि कल्पकतेने उद्योगात उडी आणि गगनभरारी. असा हा रामदास माने या माणदेशी माणसाने थक्क करणारा खडतर असा प्रवास केला आहे.

COMMENTS