Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामलल्लांच्या दर्शनासाठी सातारा-अयोध्या एसटी सज्ज; 25 नोव्हेंबरला 45 भाविक होणार रवाना

सातारा / प्रतिनिधी : अयोध्या येथे रामल्लांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर अवघ्या देशभरातून दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. सातार्‍यातूनही अन

लोकराज्य विद्या फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त स्मशानभूमीत पुरस्कार वितरण
पहिल्या पावसातच फलटण बस स्थानक बनले पाण्याचे तळे
पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहकांकडे 12 हजार कोटीचे थकले वीजबिल

सातारा / प्रतिनिधी : अयोध्या येथे रामल्लांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर अवघ्या देशभरातून दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. सातार्‍यातूनही अनेक भाविक रेल्वेचा पर्याय निवडत होते. मात्र, रेल्वे ठराविक शहरातून जात असल्याने अनेकांना लाभ घेणे शक्य होत नव्हते. यावर पर्याय म्हणून भाविकांसाठी एसटी महामंडळाने सातारा ते अयोध्या ही थेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अयोध्या येथे रामलल्लांच्या दर्शनासोबत शेगाव, काशी, प्रयागराज, अलाहाबाद ही एकाच प्रवासात पाच ठिकाणी साडेसात हजारांत देवदर्शन मिळणे शक्य होणार आहे. येत्या 25 नोव्हेंबरला सातारा येथून पहिली बस जाणार असून, त्यामधून 45 भाविक सहभागी होणार आहेत. सातारा ते अयोध्या या मार्गावर पहिला मुक्काम शेगाव येथे होणार आहे. त्या ठिकाणाहून दुसर्‍या दिवशी निघाल्यानंतर थेट अयोध्येला बस जाईल. सातारा येथून निघाल्यानंतर सातारा ते अयोध्या हा प्रवास 48 तासांचा राहणार आहे. एसटीमध्ये दोन चालक राहणार आहेत. बसमधून जाणार्‍या प्रवाशांनी स्वखर्चाने राहणे, जेवण व नाश्त्याची सोय करायची आहे.
एसटी बसमध्ये एकूण 45 सीट आरक्षित केल्या जाणार असून, ग्रुपद्वारे आरक्षित केल्यास बस सोडण्यात येणार आहेत. जेणेकरून बसचे आरक्षित लवकर होणे शक्य होणार आहे. ह्या सर्व आरामदायी बस असून, पुशबॅगची सीट, एअर सस्पेन्शन, चार्जिंगची सोय असणार आहे. सातारा ते अयोध्या अशी विशेष बससेवा सुरू करण्यापूर्वी सातारा आगारातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचार्‍यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली. यात प्रवासादरम्यान कोणत्या टप्प्यासाठी किती वेळ, विश्रांतीच्या ठिकाणांची निश्‍चिती व अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी केल्यानंतर बससेवेचे वेळापत्रक तयार केल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

COMMENTS