Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी पट्टी साठी सरपंच यांनी अधिक कल्पकता दाखवावी –  डॉ. अर्जुन गुंडे  

जलजीवन मिशन जिल्हास्तरीय कार्यशाळेत प्रतिपादन

नाशिक प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाद्वारे माझी वसुंधरा अभियान आणि जल जीवन मिशन जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आज नाशिक मधील गुरुदक्षिणा हॉल येथे आय

वातावरणाच्या बदलामुळे दुध उत्पादनात घट
वाघोलीत डॉक्टरचा तरुणावर कोयत्याने हल्ला
सराईत गुन्हेगाराला धारदार तलवारीसह घेतले ताब्यात

नाशिक प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाद्वारे माझी वसुंधरा अभियान आणि जल जीवन मिशन जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आज नाशिक मधील गुरुदक्षिणा हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.जलजीवन मिशन अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. मात्र ततपूर्वी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी जलजीवन मिशन या विषयावर बोलत असतांना ग्रामसेवक आणि सरपंच यांना पाणी पट्टी वसुलीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. पाणी पट्टी वसुलीविषयी आपण आता जागरूक होणे गरजेचे आहेत. गावातील शेवटच्या आळी पर्यंत पाणी पोहचले पाहिजे. पाण्याचे व्यवस्थापन हे समान पातळीवर होणे गरजेचे असतांना कुठलाही घटक वंचित राहता कामा नये. काही तांत्रिक बाबी लक्षात घेता आपण आपल्या स्तरावर आता गावागावात भास्करराव पेरे पाटील यांच्या कल्पनांचा उपयोग करून पाणी पट्टी वसुली केली पाहिजे. ग्रामपंचायत मार्फत आपण विविध व्यवसाय ग्रामपंचायतीत आणणे महत्वाचे आहेत. पाणीपुरवठा विभागात सध्या अनभिज्ञता असून वसुलीसाठी आपण बचतगट  यांना देखील कमिशन बेसिसवर आपण पुढे आणले पाहिजे. त्या निमित्ताने आपणास लोकांच्या स्थानिक पातळीवर होत असलेल्या हालचाली लक्षात येतील आणि गावातील वसुली विषयी आपणास होत असलेल्या अडचणी महिला बचत गटाच्या आधारे लक्षात येथील म्हणजे ग्रामपंचायत चे उत्पादन वाढ होण्यास या निमित्ताने मदत होणार असल्याचे डॉ. गुंडे यांनी म्हटले आहेत.

COMMENTS