सांगली / प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
सांगली / प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून सरोजताई पाटील यांचे नाव सुचविण्यात आले. अंनिस समिती, सल्लागार समिती, सर्व राज्य विभागांचे सदस्य या सर्वांच्या झालेल्या ऑनलाईन राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये एकमताने सरोजताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या नावास महाराष्ट्र अंनिसच्या विश्वस्त मंडळाने मान्यता दिली आहे. सरोजताईंनी ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिल्याने सर्व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
COMMENTS