Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सारेगमप विजेती गौरीचा सोमेश्‍वर महादेव संस्थानकडून गौरव

कोपरगाव ः श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्‍वर महादेव देवस्थान, सराफ बाजार, कोपरगांव येथे झी मराठी प्रदर्शित सारेगमप लि

शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली ; साई संस्थानच्या 2 कर्मचार्‍यांची चाकूने भोसकून हत्या
कोतूळ संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवृत्ती पोखरकर
कौन बनेगा नया नगरसेवक… मनपा पोटनिवडणुकीसाठी 45 टक्के मतदान; आज मतमोजणी

कोपरगाव ः श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्‍वर महादेव देवस्थान, सराफ बाजार, कोपरगांव येथे झी मराठी प्रदर्शित सारेगमप लिटिल चॅम्पची प्रथम क्रमांक विजेती कोपरगांव भुषण कु. गौरी अलका पगारे हिने सदिच्छा भेट देत अभिषेक, आरती करुन दर्शन घेतले आहे. तसेच शाळेतील सरस्वती स्तवन गायन केले. कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगांव येथे रहाते.
गौरी अतिशय बिकट परिस्थितीला सामोरे जात हे यश संपादन केले आहे. या मुळे सोमेश्‍वर महादेव देवस्थानचे वतीने महाराष्ट्राची गायिका गौरी व परिवार यांचा सन्मान करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोमेश्‍वर महादेव देवस्थाचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, व्यवस्थापक जयंत विसपुते, पौरोहित्य प्रदिपशास्री पदे, नंदू शेंडे, सोमेश्‍वर भक्त मंडळाच्या रजनीताई ठोंबरे, सौ. संगिताताई पाटील, सेवानिवृत्त नायब तहसिलदार खिंवराज दुशिंग, जयश्री कानडे गौरीला भजनाच्या माध्यमातून गायनाची गोडी लावणारे राहुल कांबळे, गौरीची आई अलका पगारे, गौरीचे मामा कैलास पगारे,भारुडसम्राट रमेश टोरपे, सोमेश्‍वर महादेव भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS