Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सारथी, महाज्योती, बार्टीची पीएच.डी. प्रवेश परीक्षा स्थगित

पुणे ः  सारथी, बार्टी, महाज्योतीकडून आयोजित करण्यात आलेल्या पीएच.डी  परीक्षेचा पुन्हा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी

साईचरणी वाबळे यांच्याकडून सुवर्णजडीत रुद्राक्ष माला दान
मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार
दीपावलीनिमित्त श्री साईबाबांच्या मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन

पुणे ः  सारथी, बार्टी, महाज्योतीकडून आयोजित करण्यात आलेल्या पीएच.डी  परीक्षेचा पुन्हा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकत मोठा गोंधळ केला होता. यानंतर गुरूवारी पुणे विद्यापीठाने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत प्रश्‍नसंच सी आणि डी सीलबंद नसल्याने परीक्षेत गैरकारभार झाल्याने परीक्षेला स्थगिती दिली, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.   विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेय परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, ’’सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे घेण्यात येणार्‍या पीएच.डी. फेलोशिपच्या संयुक्त चाळणी परीक्षेचे आयोजन बुधवार, 10 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10.00 ते 15.00 या वेळेत पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील परीक्षा केंद्रांमार्फत आयोजित करण्यात आले होते. परीक्षेसाठी ए, बी, सी व डी अशा चार प्रश्‍नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती. यात सांगण्यात आले आहे की, ’’प्रश्‍नपत्रिका संचांची छपाई दोन वेगवेगळ्या मुद्रणालयांकडून गोपनीयरीत्या करुन घेण्यात आली होती, त्यामुळे छपाई करण्याच्या स्वरुपामध्ये बदल असू शकतो. संपूर्ण परीक्षा प्रक्रियादेखील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत परीक्षार्थीनी दिलेल्या निवेदनाचा विचार करता, विद्यापीठाने परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित केले आहे

COMMENTS