Homeताज्या बातम्यादेश

धीरेंद्र शास्त्रींकडून संत तुकाराम महाराजांचा अवमान

वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट

रायपूर/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र महाराज शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांचा दैवी दरबार चर्चेत आहे. याबाबत

सत्ता संघर्षाचा पेच कायम
तारुण्यात ज्ञानसमृद्ध, परोपकारी व नीतिमान व्हावे ः किशोर काळोखे
मतदारांना सुरक्षेची गरज असताना, निवडणूक आयुक्तच सुरक्षा कवचात !

रायपूर/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र महाराज शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांचा दैवी दरबार चर्चेत आहे. याबाबत नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हानही दिले होते. तेव्हापासून धीरेंद्र शास्त्री प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. मात्र सध्या त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात असून खासदार सुप्रिया सुळेंसह अनेकांनी त्याबद्दल निषेध केला आहे.

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्‍वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्‍वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्‍वर बाबांनी नव्या वादाला फोडणी दिल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो.

मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्‍वर बाबांचा निषेध नोंदवला आहे. बागेश्‍वर धाम यांनी जगतगुरु तुकारामाबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्‍वर बाबांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी केली.राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही बागेश्‍वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला. बागेश्‍वर बाबांनी तुकारामांवर आक्षेपार्ह विधान केले असेल तर ते दाखवणे बंद करा. मी सुद्धा आध्यात्माला मानते. पण वाईट आहे म्हणून नाही करत. मला वाटतं म्हणून करते. संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल कोणी काही बोलले असेल तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारायची – संत तुकाराम महाराजांबद्दल बोलताना धीरेंद्र बागेश्‍वर बाबाने त्यांची बायको त्यांना रोज मारायची, त्यामुळे ते देव देव करायला लागले, असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार टीका होत आहे. तुकाराम महाराज यांनी अन्नप्राशन केल्याशिवाय त्यांच्या पत्नी जेवण करत नव्हत्या, त्यामुळे चुकीचा इतिहास पसरवू नका, तुम्हाला जर खरी माहिती घ्यायची असेल तर देहू मध्ये या आणि तुकाराम महाराजांची माहिती घ्या, अशा शब्दात देहू (ऊशर्ही) संस्थानकडून बागेश्‍वर बाबांना सुनावले आहे.

COMMENTS