Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांनी चाटूगिरी आणि चोंबडेपणा थांबवावा  

काँगे्रस नेते नाना पटोले यांनी खडसावले

नागपूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवारांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलेच खडसावल्यानंतर आता काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न
कायदा मंत्रिपदावर बसू शकेल अशी व्यक्तीच केंद्राकडे नाही – संजय राऊत
रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका

नागपूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवारांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलेच खडसावल्यानंतर आता काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राऊतांना चाटूगिरी आणि चोंबडेपणा थांबवा अशा शब्दात खडसावले आहे. राऊतांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा उल्लेख करून काँग्रेसमध्ये निर्णय राहुल गांधी किंवा गांधी कुटुंब घेत असल्याचं वक्तव्य केल्याबाबत नाना पटोलेंना विचारणा झाली.

यावर बोलतांना पटोले म्हणाले की, संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवारावर हे लांच्छन लावणे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. गांधी परिवार त्यागाचा परिवार आहे. पंतप्रधानपद त्या कुटुंबाने सोडले आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले आहे. मल्लिकार्जून खरगे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. ते अनेक वर्ष आमदार-खासदार होते, अशा शब्दात पटोलेंनी खडसावले. राष्ट्रवादी संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करणार नाही. जर राष्ट्रवादी भाजप सोबत गेली तरी आम्ही भाजपविरोधात लढू. भाजप विरोधात लढण्यासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवार सोनिया गांधीकडे गेले होते. सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या. शरद पवार यांच्या आत्मचरित्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण होत असताना काँग्रेसच्या भूमिकेबद्दल जे आरोप करण्यात आले आहे. त्याबद्दल योग्य वेळी उत्तर देऊ असे नाना पटोले म्हणाले. शरद पवार मोठे नेते आहे ते काहीही बोलू शकतात लिहू शकतात योग्यवेळी त्याबद्दल प्रतिक्रिया देऊ, असे नाना पटोले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे सुरू आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे. कोणाला अध्यक्ष करावा हा त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये आम्ही फारसा हस्तक्षेप करणार नाही. काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही झालं ते आम्हाला फारसे माहित नाही. आम्ही प्रकाशन सोहळ्याच कार्यक्रम पाहिलाच नाही. त्यामुळे निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय बोलत होते याची कल्पना नसल्याचे पटोले यांनी सांगितले.

राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात ः संजय राऊत नाना पटोले यांनी जहरी शब्दात टीका केल्यानंतर यावर बोलतांना खासदार संजय राऊत म्हणाले की, नाना पटोले यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांचा पक्ष त्यांनाच गांभीर्याने घेत नाही. मी राहुल गांधींशी यावर चर्चा करेन. त्यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात, असे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पटोले विरुद्ध राऊत वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS