नवी दिल्ली : रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे अर्थात आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून केंद्र सरकारने सोमवारी महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आ

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे अर्थात आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून केंद्र सरकारने सोमवारी महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. ते आरबीआयचे 26 वे गव्हर्नर असतील आणि सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. 12 डिसेंबर 2018 रोजी शक्तिकांत दास यांना गव्हर्नर बनवण्यात आले. नंतर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला. मात्र त्यांच्या मुदतवाढीचा कार्यकाळ संपल्यानंतर संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मल्होत्रा यांची गणना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या अधिकार्यांमध्ये केली जाते.
अर्थविषयक बाबींमध्ये मल्होत्रा यांची गणना सुधारक आणि मजबूत काम करणार्या अधिकार्यांमध्ये केली जाते. त्यांना राजस्थानातील जवळपास सर्वच विभागात काम करण्याचा अनुभव आहे. केंद्रातील अर्थ मंत्रालयात काम केले आहे. ते मूळचे राजस्थानचेच आहेत. मल्होत्रा यांची गणना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या अधिकार्यांमध्ये केली जाते.
COMMENTS