Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय आनंदकर यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड  

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असणारे मांडवगण येथील मा.सरपंच तथा सोसायटीचे मा.चेअरमन संजय आनंदकर यांची राष्ट्री

राहुरी कृषी बाजार समिती होणार डिजिटल ः अरूण तनपुरे
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मढी येथील यात्रेसाठी सर्वांनी जबाबदारी उचलावी

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असणारे मांडवगण येथील मा.सरपंच तथा सोसायटीचे मा.चेअरमन संजय आनंदकर यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्याचे मा. महसूल मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आनंदकर यांना प्रदान करण्यात आले. काँग्रेस नेते घन:शाम शेलार यांचे निकटवर्तीय असणारे संजय आनंदकर यांनी यापूर्वी देखील तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर पदे भूषवली आहेत. या अनुभवाचा फायदा नक्कीच जिल्हा काँग्रेसला नव संजीवनी देणारा ठरेल असा आशावाद यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेस नेते घन:शाम शेलार, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, जि.प.सदस्य किरण पाटील, तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, ऍड संजय काळबांडे, केशव झेंडे, संतोष कुदांडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS