सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरसीने मतदान होईल अशी शक्यता असताना मागील निवडणुकीपेक्षा टक्का घटला. बँकेच्या 21 पै
सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरसीने मतदान होईल अशी शक्यता असताना मागील निवडणुकीपेक्षा टक्का घटला. बँकेच्या 21 पैकी 18 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत 85.31 टक्के मतदान झाले. सांगलीतील केंद्रावर सर्वात कमी 53 टक्के मतदान झाले. आटपाडीतील केंद्रावर सर्वाधिक 99.38 टक्के मतदान होण्याचा विक्रम झाला.
सांगली जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत 99 टक्के मतदान झाले होते. यंदाही तेवढेच मतदान होईल, अशी अपेक्षा होती. परंतू प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसून आली नाही. जिल्ह्यातील 12 ठिकाणी सकाळी 8 पासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळच्या टप्प्यात चुरसीने मतदान झाले. दुपारी 12 पर्यंत 2573 पैकी 1436 मतदारांनी मतदान केले होते. दुपारी 12 वाजताच 56 टक्के मतदान झाल्यामुळे मतदानाचा टक् का वाढेल असे चित्र होते. दुपारीचार वाजता 85 टक्के मतदान झाल्यामुळे 90 टक्केहून अधिक मतदान होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात सांगलीतील केंद्रावर उमेदवारांची निराशा झाली. नेते व उमेदवार तळ ठोकून असताना या केंद्रावर 53 टक्के मतदान झाले. सांगली जिल्ह्यात एकूण 85.31 टक्के मतदान झाले.
दरम्यान, नेते मंडळींसह उमेदवार मतदान केंद्रावर भेटी देऊन मतदानाची आकडेवारी घेत होते. सांगली जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी तीन जागावर महाआघाडीचे आ.अनिल बाबर, आ. मानसिंगराव नाईक, महेंद्र लाड हे तीन उमेदवार यापूर्वी बिनविरोध निवडून आले होते. उर्वरीत 18 जागांसाठी महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत झाली. सहकार पॅनेलने 18 तर भाजपच्या शेतकरी पॅनेलने 16 उमेदवार रिंगणात उभे केले होते. तसेच 12 अपक्षही रिंगणात उतरले आहेत. अपक्ष जर बँकेच्या संचालक पदी निवडल्यास मोठी अर्थपूर्ण घडामोडी होणार असून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्हा बँकेची निवडणूक प्रथमच पक्षीय पातळीवर होत आहे. त्यामुळे महाआघाडी आणि भाजप उमेदवारांमध्ये चुरस आहे. सोसायटी गटातील जत, आटपाडी, तासगाव आणि अन्य गटात चुरस निर्माण झाली आहे. क्रॉस व्होटींगची भिती असल्यामुळे उमेदवार दक्ष होते. मंगळवार, दि. 23 मिरजेत शेतकरी भवनात मतमोजणी होणार आहे.
तालुकानिहाय मतदान व कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे : आटपाडी 159 (99.38), कवठेमहांकाळ 159 (92.44), खानापूर 121 (91.67), जत 162 (85.71), तासगाव 184 (78.63), मिरज 132 (79.52), वाळवा 290 (97.64), वाळवा- 215 (91.49), शिराळा 208 (98.18), पलूस 184 (97.35), कडेगाव 149 (98.68), सांगली 232 (53.21).
COMMENTS