Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मॅरेथॉनमध्ये सलग 11 व्या वर्षी हजारोंच्या संख्येने धावले संगमनेरकर

उद्योगपती स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृतींना उजाळा

संगमनेर ः मालपाणी उद्योग समूहाचे प्रेरणास्थान स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ 11 फेब्रुवारी 2024 रोजी संगमनेरमधील युवक-युवती, विद्यार्थी

राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
श्रीगोंद्यात कायदेभंग…प्रतिबंधित बीटी वांग्याची होणार जाहीर लागवड
वृद्धेश्‍वरकडून महिला बचत गटांना 1 कोटी 27 लाखांचे कर्ज वाटप

संगमनेर ः मालपाणी उद्योग समूहाचे प्रेरणास्थान स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ 11 फेब्रुवारी 2024 रोजी संगमनेरमधील युवक-युवती, विद्यार्थी, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सफायर मॅरेथॉनमध्ये धावले. सकाळी 7 वाजता थंडीतही हजारोंच्या संख्येने नागरिक या सफायर मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले हे लायन्स संगमनेर सफायरचे मोठे यश असल्याचे माजी अध्यक्ष व एमजेएफ गिरीश मालपाणी यांनी सांगितले. सलग 11 व्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन लायन्स सफायरने केले. व्यायामाबाबत जागरूकता, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी धावणे हा उत्तम पर्याय आहे. हा उद्देश सफल झाल्याचे प्रकल्प संयोजक श्रीनिवास भंडारी यांनी सांगितले. प्रकल्प प्रमुख म्हणून सुनिता मालपाणी, सुमित मणियार, चैतन्य काळे, कल्याण कासट,  कृष्णा आसावा यांनी काम बघितले तर राजेश मालपाणी, महेश डंग, अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांनी मॅरेथॉनचे यशस्वी संयोजन केले. संगमनेर शहरातील कॉलेज रोडवर  स्पर्धकांच्या भरगच्च उपस्थितीत झालेला हा धावण्याचा उपक्रम दुतर्फा उभे राहून अनेक संगमनेरकर क्रीडा रसिकांनी डोळ्यात साठवून घेतला. स्कीनव्हेस्ट ब्युटी सोल्युशन्सच्या एमडी दिव्या मालपाणी यांनीही ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्रक मिळविले.

यावर्षीच्या मॅरेथॉनमध्ये 7 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 7 किमीमध्ये मालपाणी लॉन्स ते राजहंस दुध संघ आणि शेवट पुन्हा मालपाणी लॉन्स असा मार्ग होता. 10 किमीमध्ये मालपाणी लॉन्स, बस स्थानक ते अमृतवाहिनी इंजि. कॉलेज आणि शेवट मालपाणी लॉन्स असा मार्ग होता. मोफत प्रवेश असलेल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धकाला मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.या मॅरेथॉनसाठी मालपाणी ग्रुप यांनी प्रायोजकत्व घेतले तर स्वदेश उद्योग समूहाने मॅरेथॉन कॅपचे प्रायोजकत्व घेतले. यावेळी मॅरेथॉन पूर्ण करणारा प्रत्येक स्पर्धक हा विजेताच आहे या अनुशंगाने कोणताही गुणानुक्रम काढण्यात आला नाही. स्पर्धेची थीम रन फॉर फन अशी असल्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने अगदी आनंदाने मॅरेथॉन पूर्ण केली. मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या स्पर्धकांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून पुढील वर्षी अधिक जोशाने आणि उत्साहाने ही मॅरेथॉन भरविणार असल्याचे अध्यक्ष अतुल अभंग यांनी सांगितले. स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनिष मालपाणी, गिरिश मालपाणी, सुनीता मालपाणी, स्वदेश प्रॉपर्टीचे बाळासाहेब देशमाने, सत्यम वारे, डॉ अमोल पाठक, राजेंद्र राहाणे, धनंजय धुमाळ यांसह अनेक लायन्स सफायरचे सदस्य उपस्थित होते.

COMMENTS