संगमनेर News : एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या

Homeताज्या बातम्या

संगमनेर News : एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या

संगमनेर / प्रतिनिधीसंगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंदे आणि कत्तलखान्यांवरील पोलिसांच्या कारवाईनंतर आता चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच शहर पोल

जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण
आदीवासींना न्याय मिळवून दिला ः डामोर
इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंदे आणि कत्तलखान्यांवरील पोलिसांच्या कारवाईनंतर आता चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, निमोण आणि घारगाव येथे झालेल्या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटना एकाच दिवशी घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संगमनेरला पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका आश्वी व घारगाव ही चार पोलिस ठाणी असूनही चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. सोमवारी शहर हद्दीत रायते फाटा येथे झालेल्या घरफोडीत १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. मंगळवारी, संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीत तब्बल ४ लाख ८६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली.

त्याच दिवशी, निमोण गावात चोरट्यांनी घर फोडून ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. संगमनेर शहरात झालेल्या घरफोडीत १ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेली, तर तालुक्यातील पिंपळे गावातून ३० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवले.

घरफोड्यांसोबतच संगमनेर तालुक्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील बसस्थानकावर गंठण चोरी, पर्स आणि पाकीट चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. एकाच दिवसात शहर, ग्रामीण आणि घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी घरफोड्या झाल्याने, चोरट्यांनी संपूर्ण तालुकाच आपले कार्यक्षेत्र बनवले आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

COMMENTS