टीईटी पेपरफुटीचे संगमनेर कनेक्शन चर्चेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टीईटी पेपरफुटीचे संगमनेर कनेक्शन चर्चेत

पुणे/अहमदनगर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी पेपरफुटीप्रकरणात पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे

आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपये द्या
कोविडचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे – तहसीलदार उमेश पाटील
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील आयटी विभागातील 40 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड

पुणे/अहमदनगर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी पेपरफुटीप्रकरणात पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे याला संगमनेरमधून पुणे पोलिसांनी अटक केली. तसेच बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे. जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासुन टीईटीच्या परिक्षेतील हे गैरप्रकार सुरु होते, असे आता स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे हा 1993-1996 संगमनेरच्या अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तर शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे हा देखील संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. सुखदेव ढेरे यांचा संगमनेर शहरातील अकोले रोड परिसरात बंगला आहे आणि गेल्या चार वर्षांपासून या ठिकाणी ते सेवानिवृत्त झाल्यापासून वास्तव्य करतात. काल दुपारच्या सुमारास पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना अटक केली आहे. 2018 साली झालेल्या गैरव्यवहारात आयुक्त म्हणून सहभागी असल्याचा आरोप पोलिसांनी केलेला आणि त्या प्रकरणी आता त्यांची चौकशी सुरू आहे. 2018 ला झालेल्या टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाला होता. यातील पहिली अटक जीए टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्‍विन कुमार याची आहे. अश्‍विन कुमारला पुणे पोलीसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे. तर दुसरी महत्त्वाची अटक महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांची आहे. संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातून डेरेंना पोलिसांनी अटक केली आहे. अश्‍विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रितेश देशमुखचा वरिष्ठ आहे. तर सुखदेव डेरे हे 2017 साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचे समोर आले आहे. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे 2017 ते 2020 या काळात शिक्षण परिषदेचे परीक्षा घेण्याचे कंत्राट होते. मधल्या काळात सुखदेव डेरे हे सेवानिवृत्त झाले आहेत.

पेपरफुटीत भाजपच्या पदाधिकार्‍याला अटक
आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. बीड जिल्ह्यात भाजपच्या युवा मोर्चाचा उपाध्यक्ष संजय शाहूराव सानप ाला पोलिसांनी अटक केली आहे. भाजपच्या पदाधिकार्‍याला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.पेपर फुटी प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यात याआधीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 8 जणांना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून संजय सानप याची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले,

COMMENTS