Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनील उकर्डे यांना सांदिपणी गुरुकुलचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

संगमनेर ः काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने समाजकार्य सहभाग घेऊन गोरगरिब

इन्स्टाग्रामच्या फोटोत छेडछाड़ करून व्हीडीओद्वारे बदनामी
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
मानोरीत भर दिवसा बिबट्याचा धुमाकुळ

संगमनेर ः काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने समाजकार्य सहभाग घेऊन गोरगरिबांची सेवा करणारे सुनील भाऊ उकिरडे यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. घुलेवाडी येथील सांदिपणी वारकरी संस्थेच्या वतीने समाजकार्यात उल्लेखनीय काम सुनील उकिरडे यांचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मठाधिपती ह.भ.प. राम महाराज पवार, ह.भ.प. सखाराम महाराज तांगडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रोहिदास महाराज बर्गे, स्वामी समर्थ मठाचे प्रदीप दादा सोनवणे, अनंत महाराज काळे, संदीप कुटे, गणेश गाडे, बाळासाहेब महाराज रंजाळे, सुभाष कुटे, विलास कुटे, सिताराम राऊत, गणपत पवार, बाळासाहेब आहेर, उत्तम महाराज गाडे, अमोल महाराज गाडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सुनील उकिरडे हे मागील अनेक वर्षापासून संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत सेवाभावी पणे काम करत आहेत विशेषता वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम राहिले आहे आपला माणूस आपल्यासाठी असे काम करताना त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना राज्यभरातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सांदिपणी गुरुकुल च्या वतीने पहिल्यांदा देण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, या पुरस्कारातून नक्कीच काम करणार्‍या व्यक्तींना बळ मिळणार आहे. सुनील उकीर्डे यांनी सातत्याने लोकांसाठी काम केले असून आरोग्य क्षेत्र हे सेवा करण्याची मोठे क्षेत्र आहे. अध्यात्म आणि आरोग्य क्षेत्र एकत्र आल्या चांगल्या समाज निर्मितीसाठी उपयोगी ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या तर तांगडे महाराज म्हणाले की, सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या व्यक्तीला जे समाधान मिळते ते अत्यंत मोलाची आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल उकिरडे यांचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, जि.प. सदस्य महेंद्र गोडगे, प्राचार्य हरिभाऊ दिघे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS