Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांदिपनी अकॅडमीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या अंगणात लावला आनंदाचा दिवा

बालघर प्रकल्पातील वंचित मुलांसह दिवाळी साजरी आतषबाजीने परिसर उजळले

अहमदनगर प्रतिनिधी - शहरातील श्री सांदिपनी अकॅडमीने वंचित व दुर्घल, घटकातील विद्यार्थ्यांचा अंगणात आनंदाचा दिवा प्रज्वलीत करुन मोठ्या उत्साहात दिवाळी

जिल्ह्यातील परळी पीपल्स ठेवीदारांच्या आशा पल्लवीत
कर्जतच्या सदगुरु कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार
अंजनापूरच्या वृक्षप्रेमींचे कार्य प्रेरणादायी ः माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

अहमदनगर प्रतिनिधी – शहरातील श्री सांदिपनी अकॅडमीने वंचित व दुर्घल, घटकातील विद्यार्थ्यांचा अंगणात आनंदाचा दिवा प्रज्वलीत करुन मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांसह सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीचा आनंद लुटला. लखलखत्या पणत्यांचा झगमगाटात, फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळून निघाले.
अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू व बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, अकॅडमीचे प्रा. नानासाहेब बारहाते, प्रा. अमित पुरोहित, प्रा. मनिष कुमार, राहुल गुजराल, अतिश काळे, सुधीर काळे, ज्ञानोबा फड, अ‍ॅड. जगताप, श्रीकांत भोस, अनुष्का शर्मा, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन सय्यद आदींसह अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.
के. बालराजू यांनी वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. दिवाळी सणाचा आनंद साजरा करून, तो आनंद वाटायचा असतो. समाजातील दुःखाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
संध्याकाळी पणत्यांच्या प्रकाशाने बालघर प्रकल्पात लखलखाट झाला होता. तर फटाक्यांच्या आतषबाजीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. या धमालमय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊ, चॉकलेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

COMMENTS