श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य पदविकाधर पशुवैद्यक संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील संदीप भाऊसाहेब आल्हाट यांची निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण नाशिक विभागातील पदविकाधर पशुवैद्यक कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संदीप आल्हाट हे सध्या पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती श्रीगोंदा येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी पारगाव सुद्रिक ग्रामपंचायतीत लिपिक पदावर कार्य करताना त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे संघटनात्मक कामकाजाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. सामाजिक व संघटनात्मक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित कार्यशैली यामुळे पशुवैद्यक कर्मचारी वर्गात त्यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहेत. आल्हाट यांच्या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक विभागातील विविध स्तरांतून तसेच पशुवैद्यक क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य पदविकाधर पशुवैद्यक संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील संदीप भाऊसाहेब आल्हाट यांची निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण नाशिक विभागातील पदविकाधर पशुवैद्यक कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संदीप आल्हाट हे सध्या पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती श्रीगोंदा येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी पारगाव सुद्रिक ग्रामपंचायतीत लिपिक पदावर कार्य करताना त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे संघटनात्मक कामकाजाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. सामाजिक व संघटनात्मक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित कार्यशैली यामुळे पशुवैद्यक कर्मचारी वर्गात त्यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहेत. आल्हाट यांच्या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक विभागातील विविध स्तरांतून तसेच पशुवैद्यक क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS