Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू तस्करांकडून दहशतीसाठी सोशल मीडियावर रिल्स

संगमनेर तालुक्यातील प्रकार ; कारवाईची मागणी संगमनेर : संगमनेर तालुक्यात बिन बोभाट वाळू तस्करी करून वाळू तस्कर रिल्स बनवत असून प्रशासनासह नागरिकांवर दडपशाही निर्माण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. प्रवरा नदीच्या काठी विविध गावांमधून वाळू तस्करांनी नवी शक्कल शोधून वीस पंचवीस मोटरसायकल एकत्र येऊन मोटारसायकल वरून बिन बोभाट वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीचे रिल्स सोशल मीडिया टाकले जात आहेत.  वाळू तस्करीतून मिळालेला अवैध पैसा हा व्यसनासाठी वापरला जात असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. संगमनेर तालुक्याला हा मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी याकडे डोळेझाक करू नये, त्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.     सोशल मीडियावर तस्करांचा धुमाकूळ संगमनेर तालुक्यातील वाळू तस्कर हे विना नंबर प्लेट वाहन वाळू तस्करीसाठी वापरत असून त्यांचे डंपर गाड्या व मोटरसायकल या विना नंबर असून ते व्हिडिओ व रिल्स करत आहेत. ते समाज माध्यमांवर टाकत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक भयग्रस्त झाल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी बोलताना दिली.

Solapur : वाळू तस्कराने चिरडलेल्या पोलिसावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…
गोदावरीत वाळू माफियांवर नांदेड ग्रामीण पोलीसांचा सर्जिकल स्ट्राईक
मुदखेडमध्ये वाळू माफियांचा उच्छाद: गोदावरीच्या पात्रात ’सक्शन मशीन’द्वारे अवैध उपसा, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष?

संगमनेर तालुक्यातील प्रकार ; कारवाईची मागणी

संगमनेर : संगमनेर तालुक्यात बिन बोभाट वाळू तस्करी करून वाळू तस्कर रिल्स बनवत असून प्रशासनासह नागरिकांवर दडपशाही निर्माण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.

प्रवरा नदीच्या काठी विविध गावांमधून वाळू तस्करांनी नवी शक्कल शोधून वीस पंचवीस मोटरसायकल एकत्र येऊन मोटारसायकल वरून बिन बोभाट वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीचे रिल्स सोशल मीडिया टाकले जात आहेत. 

वाळू तस्करीतून मिळालेला अवैध पैसा हा व्यसनासाठी वापरला जात असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. संगमनेर तालुक्याला हा मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी याकडे डोळेझाक करू नये, त्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

 

सोशल मीडियावर तस्करांचा धुमाकूळ

संगमनेर तालुक्यातील वाळू तस्कर हे विना नंबर प्लेट वाहन वाळू तस्करीसाठी वापरत असून त्यांचे डंपर गाड्या व मोटरसायकल या विना नंबर असून ते व्हिडिओ व रिल्स करत आहेत. ते समाज माध्यमांवर टाकत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक भयग्रस्त झाल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी बोलताना दिली.

COMMENTS