Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सनातन संस्कृती कधीही नाश पावणारी नाही : महंत रामगिरीजी महाराज

श्रीगोंद्यात विराट हिंदू संमेलन श्रीगोंदा :  सनातन संस्कृती ही कधीही नाश पावणारी नाही. सनातन हीच भारतीय संस्कृती असून अनेक परकीय आक्रमण होऊनही

सद्गुरू कृषी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात 
शेवगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा; मोफत भाजीपाला वाटप करून निषेध
जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता

श्रीगोंद्यात विराट हिंदू संमेलन

श्रीगोंदा :  सनातन संस्कृती ही कधीही नाश पावणारी नाही. सनातन हीच भारतीय संस्कृती असून अनेक परकीय आक्रमण होऊनही ती आजपर्यंत टिकून आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी केले. श्रीगोंदा शहरात आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनात रामगिरीजी महाराज यांनी मार्गदर्शन करताना सनातन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

 महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की, हिंदू समाज असंघटित असल्याचा फायदा अनेक आक्रमकांनी घेतला. त्यामुळे हिंदू समाजाकडे शत्रुबोध, इतिहासबोध आणि स्वयंबोध असणे अत्यंत आवश्यक आहे. इतिहासातून धडे घेतले नाहीत तर त्याची पुनरावृत्ती होत असते. धर्माचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून समाजाने एकत्र येऊन संस्कृती जपली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून भूषण महाराज उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे यांनीही मार्गदर्शन केले. समाज एकत्र आला तर तो सुसंघटित होतो आणि संघटना समाजनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. समाज परिवर्तनासाठी शक्ती आवश्यक असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महंत रामगिरीजी महाराज यांनी पुढे बोलताना वक्फ बोर्डावरही टीका केली. त्यांनी सांगितले की, वक्फ बोर्ड भूमाफियासारखे काम करत असून हिंदू मंदिरांच्या जमिनींवर दावे केले जात आहेत. मढी येथील नाथांच्या जमिनीवरही वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी त्यांनी संत परंपरेचा उल्लेख करत सांगितले की, संतांनी जातिभेदाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य केले. वारकरी संप्रदायात विविध जाती-धर्मातील संतांनी एकत्र येऊन समाजाला एकतेचा संदेश दिला. संत शेख महमद महाराज हे मुस्लिम असूनही त्यांनी वारकरी परंपरेनुसार जीवन जगत पांडुरंगाची भक्ती केली, असे उदाहरण देत त्यांनी समाजातील ऐक्याचा संदेश दिला.

इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी महमूद गझनी याने सोमनाथ मंदिरावर अनेक वेळा आक्रमणे केल्याचे सांगितले. तसेच औरंगजेब याचा भाऊ दाराशुकोह हा उपनिषदांचा अभ्यासक होता, मात्र त्याला औरंगजेबाने ठार मारले, असा इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. रविंद्र जंजिरे यांनी केले तर आभार सुनील अनभुले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद कुलकर्णी व आदित्य अनवणे यांनी केले. या संमेलनाला माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलका अनभुले, अनिल रामदासी यांच्यासह नगरसेवक, वारकरी, भाविक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS