Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यातून दहावीत परीक्षेत समृद्धी शेळके द्वितीय      

कोपरगाव तालुका ः पुणे विभागाकडून घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेत कोपरगाव येथील कन्या विद्यालयाची कु. ज्ञानेश्‍वरी लोहकणे 97.40 टक्के गुण मिळवून

 आजी खेळाडूचे पालकत्व स्वीकारण्याचा एक नवीन पायंडा ः प्राचार्य चौरे
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची नितीन गडकरी यांची घोषणा
ममदापूरातून गोमांसह दोन आरोपींना अटक

कोपरगाव तालुका ः पुणे विभागाकडून घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेत कोपरगाव येथील कन्या विद्यालयाची कु. ज्ञानेश्‍वरी लोहकणे 97.40 टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम आली तर रवंदे येथील शिवशंकर विद्यालयाची विद्यार्थिनी कु. समृद्धी विजय शेळके हिने 95.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला तसेच तालुक्यातील ग्रामीण विभागातून प्रथम क्रमांक मिळविला तसेच कोपरगाव तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. समृद्धी ही सांगवी भुसार येथील पत्रकार विजय शेळके यांची कन्या आहे.
कोपरगाव येथील कॉनक्यूरोर अकॅडमी तर्फे नुकताच तालुक्यातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तिला वर्गशिक्षिका शालन ढोले, रामचंद्र चावरे, मुख्याध्यापक बी.आर.बीरे, उज्ज्वला म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या यशाबद्दल स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब कदम, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनी विखे, डॉ. सुजय विखे, आमदार आशुतोष काळे, स्नेहलता कोल्हे, राहुल विखे, बाबासाहेब गोसावी, ज्ञानदेव गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS