Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस OTT 2’ मध्ये सलमान खानने केलं धूम्रपान

मुंबई प्रतिनिधी - ‘बिग बॉस हिंदी’चं पहिलं ओटीटी पर्व सुपरहिट ठरल्यानंतर आता या शोचं दुसरा ओटीटी पर्व सुरू झालं आहे. या पर्वाच्या पहिल्या भाग

गुरुपौर्णिमेनिमित्त भगवानगडावर सोमवारी गुरुपूजन सोहळा
सल आणि सूड ! 
वाह ! क्या बात है , स्कीइंग १च नंबर | LokNews24

मुंबई प्रतिनिधी – ‘बिग बॉस हिंदी’चं पहिलं ओटीटी पर्व सुपरहिट ठरल्यानंतर आता या शोचं दुसरा ओटीटी पर्व सुरू झालं आहे. या पर्वाच्या पहिल्या भागापासून हे पर्व ‘या स्पर्धकांमुळे’चांगलंच चर्चेत आलं आहे. पण सध्या या पर्वाचा होस्ट सलमान खान चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. या फोटोमध्ये सलमान खान बॉस ओटीटी २ होस्ट करताना हातात सिगरेट दिसत आहे. एवढंच नाही तर सलमानने एक आक्षेपार्ह शब्दाचा वापरही केल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी, बिग बॉस ओटीटीच्या एपिसोडमध्ये सलमान खान पुन्हा स्पर्धकांशी बोलण्यासाठी आला होता. या दरम्यानचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वायरल फोटोमध्ये सलमानच्या हातात पांढरी सिगरेट दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो बघून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस तक’ने सलमानचा हा फोटो ट्वीट केला आहे. सलमानचा हा फोटो बघून अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. अनेकांची त्याचं वागणं असभ्य असल्याचे म्हणले आहे. एवढचं नाही तर काहींनी त्याला पाखंडीही म्हणले आहे.  बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीझन सध्या चर्चेत आहे. घरातील स्पर्धेकांमधील वाद आणि राजकारणाने दिवसेंदिवस हा सीझन मनोरंजक बनत चालला आहे. आलिया सिद्दीकी, पलक पुरस्वानी आणि पुनीत सुपरस्टारनंतर अलीकडेच आकांक्षा पुरीलाही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. घराबाहेर पडल्यावर मीडियाशी बोलताना आकांक्षा पुरीने जैद हदीदशी किसिंगनंतर झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. तिने त्या किसिंग प्रकरणाला फक्त एक टास्क म्हटलंय.

COMMENTS