Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘टायगर 3’ च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमामुळे चर्चेत होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा

सलमानच्या घरावर गोळीबार करणारा पाचवा आरोपी अटकेत
बिग बॉसच्या घरात राडा
सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीची आत्महत्या

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमामुळे चर्चेत होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. चाहत्यांना आता त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या सिनेमाची प्रतीक्षा आहे. भाईजान सध्या ‘टायगर 3’ या सिनेमाचं शूटिंग करत असून या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. ‘टायगर 3’च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गंभीर दुखापतीबाबत माहिती दिली आहे. ‘टायगर 3’च्या सेटर भाईजानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पाठमोरा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या फोटोमध्ये त्याच्या पाठीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. सलमानला नेमकी कशामुळे दुखापत झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सलमानने पाठमोरा फोटो शेअर करत लिहिलं आहे,”जेव्हा तुम्हाला वाटतं की संपूर्ण जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे त्यावेळी जगाला सोडा आणि पाच किलोच्या डंबलचे वजन उचलून दाखवा… टायगर जखमी आहे”. सलमानचा हा फोटो पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तसेच त्याची जखम लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. सलमानच्या या फोटोवर काळजी घे, प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, जखमी टायगरपेक्षा खतरनाक कोणी असू शकत नाही’, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

COMMENTS