Homeताज्या बातम्यामनोरंजन

सौदी अरेबियाच्या बॉक्सिंग मॅचमध्ये सलमान खान

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान नुकताच सौदी अरेबियाती गेला होता. रियाधमध्ये होणारी टायसन फ्युरी आणि फ्रांसिस नगनौ ही बॉक्सिंग मॅच त्याने पाहिली. विशे

‘टायगर 3’ च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत
चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’ मध्ये सलमानची जबरदस्त एण्ट्री.
शाहरुख खान आणि सलमान खान येणार पुन्हा एकत्र ?

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान नुकताच सौदी अरेबियाती गेला होता. रियाधमध्ये होणारी टायसन फ्युरी आणि फ्रांसिस नगनौ ही बॉक्सिंग मॅच त्याने पाहिली. विशेष म्हणजे यावेळी त्याच्या बाजूला चक्क रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज होते. सलमानच्या बाजूला जॉर्जिना आणि तिच्या बाजूला रोनाल्डो बसले होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओवर चाहत्यांमध्ये चर्चाही रंगली आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये नुकतीच MMA बॉक्सिंग मॅच पार पडली. जगभरातील अनेक दिग्गजांनी लाईव्ह मॅच पाहण्याचा आनंद घेतला. यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानही दिसला. तर आश्चर्य म्हणजे त्याच्या बाजूला फुटबॉल खेळाचा ‘बाप’ ख्रिस्तियानो रोनाल्डोही बसला होता. ख्रिस्तियानोची गर्लफ्रेंड जॉर्जिना ही दोघांच्या मध्ये बसली आहे. मॅच पाहत असताना रोनाल्डो त्यात पूर्णपणे मग्न झालेला दिसत आहे. मॅचमध्ये जे घडतंय त्यावर तोही तसाच रिअॅक्ट होताना दिसत आहे. तर सलमान खानही मॅचमध्ये गुंग झाला आहे. त्यांची रिअॅक्शन पाहून मॅच नक्कीच थरारक झाली असणार याचा अंदाजा येतोय. सोशल मीडियावरील त्यांचा व्हिडिओ बघून चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. एक बॉलिवूडचा सुपरस्टार आणि एक फुटबॉलचा स्टार यांना एकत्र बघून चाहते भलतेच खूश झालेत.

COMMENTS