गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणार्‍या दुकानावर छापा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणार्‍या दुकानावर छापा

अहमदनगर/प्रतिनिधी : विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंशाची जनावरांची हत्या करून त्यांचे मांस विक्री करणार्‍या दुकानावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. या

लिंपणगावमध्ये लाथा बुक्क्याने मारहाण करत शस्त्राने वार
युवा सेनेच्या राज्य सहसचिवपदी विक्रम अनिलभैय्या राठोड यांची नियुक्ती
बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती अमोलिक

अहमदनगर/प्रतिनिधी : विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंशाची जनावरांची हत्या करून त्यांचे मांस विक्री करणार्‍या दुकानावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसानी नऊ हजार रुपये किमतीचे गोमांस व अन्य साहित्य जप्त केले. ही कारवाई झेंडीगेट परिसरातील आंबेडकर चौक येथे केली.
याबाबतची माहिती अशी की कोतवाली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, आंबेडकर चौकात गोवंश जनावरांच्या मांसाची विक्री होत आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या आदेशावरून पोलिसांनी आंबेडकर चौकातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या मुन्ना कुरेशी (राहणार झेंडीगेट) यांच्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी नऊ हजार रुपये किमतीचे 60 किलो गोमांस व एक लोखंडी कोयता असे साहित्य जप्त केले. दुकानातील एजाज अहमद शेख (रा. हातमपुरा) याला ताब्यात घेतले व जप्त मुद्देमाल एका टेम्पोत भरून टेम्पो पोलीस ठाण्यात आणला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांच्या फिर्यादीवरून मुन्ना कुरेशी व एजाज शेख याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक ए. पी. इनामदार करीत आहे. ही कारवाई पोलिस उप निरीक्षक मनोज कचरे, पोलिस नाईक भिंगारदिवे, पोलिस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांनी केली आहे.

COMMENTS